Parakram Diwas : रील लाईफमध्येही हिरो आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस ! त्यांच्यावर भाष्य करतात ‘हे’ Movies And Web Series

पोलीसनामा ऑनलाइन टीम   –   तुम मुझे खून दो मै तुम्ही आझादी दूंगा या घोषवाक्यानं भारतीयांच्या हृदयात देशासाठी सर्वस्व बलिदान करण्याची भावना निर्माण करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती ही पराक्रम दिवस म्हणून साजरी केली जाईल. आपल्या हक्कांसाठी त्यांनी लढायला शिकवलं. दुसऱ्या महायुद्धात इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्यांनी वापरलेले जय हिंद हे शब्द राष्ट्रीय घोषवाक्य ठरले. स्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी असणारे नेताजी हे रिअल लाईफ हिरो आहेत. त्यांच्यावर भाष्य करणारे अनेक सिनेमे आणि वेब सीरिज आजवर रिलीज झाल्या आहेत. याला चाहत्यांचं खूप प्रेमही मिळालं आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगॉटन हिरो –  2005 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. खास बात अशी की, नेताजींच्या सेनेत बंगाली कमी आणि पंजाब व दक्षिण भारतातील लोक जास्त होते. दक्षिण भारतात सुभाष खासे लोकप्रिय आहेत. कोलकात्यामधील श्याम बेनेगल डायरेक्टेड आणि हा सिनेमा अतुल तिवारी यांनी लिहला होता. कोलकात्यात त्यांच्या घरालाही म्युझियम बनवलं गेलं.

बोस – डेड/अलाईव्ह –   कबीर खाननं आधीही आझाद हिंद सेनेवर डॉक्युमेंट्री बनवली होती. द फॉरगॉटन आर्मी असं या याचं नाव होतं. कबीरनुसार, जेव्हा त्यानं डॉक्यमेंट्री बनवली तेव्हा त्याच्यासाठी हा जीवन बदलवणारा अनुभव होता. आझाद हिंद सेना चाललेल्या रुटवर भारत ते सिंगापूर अशी यात्राही त्यानं केली होती. हा अनुभव मनातून कधीच निघाला नाही.

या डॉक्युमेंट्रीचं खूप कौतुक झालं होतं. कबीरची इच्छा होती की, आझाद हिंद सेनेची स्टोरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. डॉक्युमेंट्री बनवल्यानंतर तब्बल दोन दशकांनी त्यानं आझाद हिंद सेनेवर द फॉरगॉटन आर्मी – आझादी के लिए ही वेब सीरिज बनवली. यात त्यांना पात्र विकसित करण्याची संधी मिळाली.

सिनेमे आणि वेब सीरिज –

1) सुभाष चंद्र (1966) –  पीयुष बोस यांच्या या बंगाली सिनेमात त्यांच्या लहानपणापासून तर लोकसेवक बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. हा सिनेमाही उत्तम आहे.

2) नेताजी सुभाषचंद्र बोस : द फॉरगॉटन हिरो –   श्याम बेनेगल डायरेक्टेड या सिनेमात सिचन खेडेकर यांनी नेताजींची भूमिका साकारली होती.

3) राग देश (2017) –  तिग्मांशु धूलियानं आझाज हिंद सेनेचे मेजर जनरल शाहनवाज खान, लेफ्टनंट कर्नल गुरबख्स सिंह ढील्लों आणि लेफ्टनंट कर्नल प्रेम सहगल यांच्यावर लाल किल्ल्यात चाललेल्या खटल्यावर सिनेमा बनवला. या खटल्याच्या निमित्तानं स्वातंत्र्य लढ्यात सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या भूमिकांशीही परिचय होतो.

4) बोस : डेड/अलाईव्ह (2017) –  सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमयी मृत्यूवर आधारीत 9 एपिसोडची ही सीरिज आहे. यात राजकुमार राव यानं नेताजींची भूमिका साकारली होती.

5) द फॉरगॉटन आर्मी :  आझादी के लिए (2020) –  कबीर खान डायरेक्टेड हा सिनेमा आझाद हिंद सेनेवर आहे. याआधी कबीर खाननं 1999 साली याच नावावं डॉक्यमेंट्री बनवली होती.