‘आरे’ मध्ये रात्रीत ४०० झाडांची कत्तल, ६० आंदोलकांना घेतले ताब्यात (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्यानंतर रात्रीत मेट्रो काॅर्पोरेशनने मध्यरात्री तब्बल ४०० झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. कारशेडमध्ये वृक्षतोड सुरु करण्यात येत असल्याचे समजताच पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी त्याला विरोध केला. तेव्हा पोलिसांनी ६० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आरे विरोधात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सर्व याचिका फेटाळून लावल्या. पर्यावरण प्रेमीचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेऊन पोलिसांची मोठी कुमक मागविण्यात आली होती. रात्री ८ वाजता झाडांची कत्तल करण्यास सुरुवात करण्यात आली. ही बाब काही वेळाने स्थानिक लोकांना समजली. त्यांनी त्याला विरोध दर्शविला.

रात्री उशिरा पर्यावरण प्रेमींना हे समजताच अनेकांनी तिकडे धाव घेतली. आतापर्यंत ६० आंदोलकांना ताब्यात घेतले असून त्यांना समतानगर आणि आरे पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
एमएमआरडीएमार्फत मेट्रो ३ साठी आरे मध्ये कारशेड बांधण्यात येणार आहे. त्यासाठी आरेतील २ हजार ६४६ झाडे तोडण्यात येणार आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये अधिकाऱ्यांना पाठवा- 
या वृक्षतोडीला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये आरे मधील इको सिस्टिम तोडणे ही लज्जास्पद बाब आहे. ज्या निष्ठूरपणे हे अधिकारी झाडांची कत्तल करत आहेत, त्यांची नेमणूक पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कॅम्पची कत्तल करण्यासाठी करा, असे म्हटले आहे.

visit : Policenama.com