दुर्दैवी ! बार्ज P-305 दुर्घटनेत पिंपरीतील 45 वर्षीय सुपरवायझरचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवादळामुळे बार्ज P-305 या जहाजाला मुंबईजवळ जलसमाधी मिळाली आहे. या जहाजावरील 188 लोकांना वाचविण्यात नौदलाला यश आले आहे. पण या दुर्घटनेत 49 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नौदलाच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करून मृतदेह बाहेर काढले आहेत. यात पिंपरी- चिंचवड मधील निलेश पिताळे (वय 45) याचा समावेश आहे. तसेच अद्यापही अनेकजण बेपत्ता असल्याचे समजते.

प्राप्त माहितीनुसार, निलेश पिताळे हे गेल्या 2 वर्षापासून या बार्जवर सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. पण तौक्ते चक्रीवादळामध्ये बार्ज बुडाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निलेशचा भाऊ विश्वनाथ पिताळे यांनी या सगळ्या प्रकाराबाबत प्रचंड दु:ख व्यक्त करून या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान 15 मे रोजी त्यांचे आपल्या भावाशी बोलणे झाले होते. त्यावेळी निलेशने त्यांना सांगितलं होतं की, मी आता जहाजावर जाणार आहे. तिथे नेटवर्क नसल्याने माझे काही आपल्याशी बोलण होणार नाही. मी घरी परतलो की, फोन करेन. पण त्यानंतर तौक्ते चक्रीवादळ आले. यात त्यांची जहाज बुडाली आणि मी माझ्या भावाला गमावलो. दरम्यान, चक्रीवादळ मुंबईत आल्यानंतर नौदलाने भर समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचविण्यासाठी तात्काल बचाव मोहीम हाती घेतली होती. जी अद्यापही सुरुच आहे. सध्या INS कोच्चीसह 5 INS जहाज अद्याप बचाव कार्य करत आहेत.