…म्हणून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी नाही तर दुसऱ्या भाजप नेत्याची लागणार वर्णी ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकांचे निकाल येत्या २३ तारखेला जाहीर होणार आहेत. अनेक माध्यमांनी एक्झिट पोल वरून निकालाचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे दिसून येत आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवल्या आहेत.

…तर पंतप्रधानपदाची संधी कुणाला ?

एक्झिट पोल नुसार जनतेचा कौल भाजपाकडे असल्याचे समोर आले आहे खरे पण भाजपचा खरा कस लागणार आहे तो बहुमतासाठी यंदाच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र जर भाजपाला बहुमत मिळले नाही तर मात्र आरएसएसकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी अन्य नेत्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो.

अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवल्यामुळे या भेटीदरम्यान नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्या भेटीदरम्यान पंतप्रधानपदाविषयी चर्चा होऊ शकते. असे एका वृत्तसमूहाने सांगितले आहे.

पंतप्रधानपदासाठी हवाय आरएसएसचा पाठिंबा ?

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार की नाही यावर पुढची गणित अवलंबून असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर अशा स्थितीत आरएसएस पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसऱ्या नावाचा विचार करु शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीतून मोदी संघाचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे का? अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मागील चार वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ मुख्यालयातील पहिला दौरा आहे.

भैय्याजी जोशी आणि गडकरींची भेट

लोकसभा निवडणूक 2019 ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी (20 मे) एक्झिट पोलचे आकडे समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास विजय वर्गीय हे सुद्धा भैय्याजी जोशी यांच्यासोबत नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या नेत्यांमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात इतर काही नवीन समीकरणं समोर येतात का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Loading...
You might also like