Tik Tok प्रकरणी अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – टिकटॉक फेम फैजूच्या समर्थनात आक्षेपार्ह व्हिडीओ अपलोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अभिनेता एजाज खानला अटक केली आहे. ही अटक टिकटॉक प्रकरणात करण्यात आली आहे. दरम्यान टिकटॉक 07 ग्रपने तबरेज अन्सारी मॉब लिंचिंग प्रकरणाबद्दल एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला होता आणि त्याचे समर्थन अभिनेता एजाज खानने केले होते. आरोपींचे देखील एजाजने समर्थन केल्याचे समोर आले होते. एवढेच नव्हे तर ज्या फैजू नावाच्या व्यक्‍तीविरूध्द सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता त्याच्या बरोबर एजाजने व्हिडीओ बनवत मुंबई पोलिसांची मस्करी केली होती.


एजाज खानने त्याच्या व्हिडीओमध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांमधील डायलॉगची मिमिक्री करून मुंबई पोलिसांची मस्करी केली होती. त्या व्हिडीओमध्ये एजाज त्या सात आरोपींसोबत दिसून येत होता.
व्हिडीओतील सात जणांनी तबरेज अन्सारीच्या मृत्यूनंतर टिकटॉक व्हिडीओ तयार केला होता आणि कोणी मुस्लिम आंतकवादी बनले तर कोणी काही म्हणू नये अशी टिप्प्णी केली होती. याबाबत मुंबईच्या गुन्हे शाखेतील उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी सांगितले की, अभिनेता एजाज खानला अटक केली असून त्याला लवकरच न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.

आरोग्य विषयक वृत्त