अंडरवर्ल्ड दाऊदचा ‘हस्तक’, ‘गँगस्टर’ एजाज लकडावालाला 21 जानेवारीपर्यंत पोलिसांचा ‘पाहुणचार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मोस्ट वॉंटेड गॅंगस्टर एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गँगस्टर असलेल्या एजाज लकडावालाला पकडून पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले. काल रात्री पाटणा विमानतळावर मुंबई पोलिसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधित पत्रकार परिषद देत माहिती दिली. ते म्हणाले की लकडावाला छोटा राजनसाठी आणि दाऊदसाठी काम करत होता. दोन दिवसांपूर्वी लकडावालाच्या मुलाला अटक करण्यात आली. एजाज लकडावालाच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार एजाज लकडावाला याला अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे.

पोलिसांकडून एजाज यांची माहिती घेण्यासाठी एजाज याच्या मुलीकडे चौकशी करण्यात आली. त्यानंतर काल रात्री पाटणा विमानतळावर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गृहमंत्री म्हणाले की युसूफ लकडावाला याला देखील पोलिसांकडून मोठ्या कौशल्याने अटक करण्यात आली. युसूफ लकडावालावर खंडणीचे 25 गुन्हे आहेत तर 4 गुन्हे मोकाअंतर्गत दाखल आहेत. गँगस्टर एजाज लकडावाला यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर आता त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/