पॉर्न फिल्म प्रकरण : अभिनेत्री गहनाच्या अटकेनंतर नवा खुलासा ! बड्या उद्योजकाच्या PA ला अटक

पोलीसनामा ऑनलानइ टीम – ‘गंदी बात’ फेम ‘अभिनेत्री गहना वसिष्ठ सध्या हिला मुंबई पोलिसांनी नुकतीच पॉर्न फिल्म प्रकरणात अटक केली. यानंतर आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याच माहितीचा आधार घेत पोलिसांनी उमेश कामत नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. उमेशनं पूर्वी एका बड्या उद्योजकाचा खासगी मदतनीस (PA) म्हणून काम केलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणी काही बडी नावंही समोर येऊ शकतात.

पॉर्न व्हिडीओ परदेशातून केव्हा आणि कसे अपलोड करायचे हे कामकाज उमेश कामत पहात असे. शुटींग झाल्यानंतर गहना वसिष्ठ तो व्हिडीओ व्ही ट्रान्सफरवर अपलोड करायची. याची एक लिंक ती अपलोडरला आणि एक लिंक उमेशला पाठवत असे. सदर व्हिडीओ कधी आणि कसा अपलोड करायचा यासंबंधित सर्व निर्णय हे उमेश घेत असे. पोलिसांनी आता उमेशला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळं आता या प्रकरणी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. सोमवारी उमेशला न्यायालया समोर हजर केलं जाणार आहे.

मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलनं रविवारी अ‍ॅक्ट्रेस गहना वसिष्ठ हिला एक अ‍ॅडल्ट व्हिडीओ शुटींग शेअर केल्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे अशी माहिती आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, गहनानं 87 अश्लील व्हिडीओ आणि पॉर्न व्हिडीओ शुट केले आहेत आणि तिच्या वेबसाईटवर अपलोड केले आहेत. ज्यांनी या चॅनेलची सदस्यता घेतली आहे त्यांना हे व्हिडीओ पाहण्यासाठी 2000 रुपये द्यावे लागतात.