कलाकारांना ड्रग्ज पुरवणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकार अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखाने अंमली पदार्थ पुरवत असलेल्या दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 139 ग्रॅम मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केले आहे. याचं बाजारमूल्य साडेपाच लाख रुपये आहे. उस्मान अन्वर अली शेख (वय 40) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार अंमली पदार्थ सेवन करत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांची चौकशी होत आहे. त्यांनाही हा उस्मान शेख अंमली पदार्थ पुरवत असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. उस्मान झोमॅटो या हॉटेल मधील खाद्यपदार्थ घरपोच पुरवणार्‍या कंपनीत काम करतो. त्याच्या आडून ग्राहकांना तो अंमली पदार्थ पुरवतो. पश्चिम उपनगरातील जोगेश्वरीच्या ओशिवरा जवळील मॉलजवळ उस्मान मेफेड्रोन अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चौकशीत त्याने अबू सुफियान खान हा एमडी पुरवत असल्याची कबुली दिली. तो चित्रपट सृष्टितील काही बड्या हस्तींनाही अंमली पदार्थ पुरवत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या दोघांची याबाबत त्या दिशेने चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like