धक्कादायक ! 58 वर्षीय डॉक्टरचा महिला रुग्णावर बलात्कार, VIDEO काढून केलं ‘ब्लॅकमेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – रुग्णांचे प्राण वाचवतात म्हणून डॉक्टरांना देव मानतात. मात्र, मुंबईत डॉक्टर पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे. एका 58 वर्षीय डॉक्टरने त्याच्याकडे आलेल्या महिला रुग्णावर बलात्कार केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर त्याने व्हिडीओ बनवून पीडित महिलेला ब्लॅकमेल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 58 वर्षीय डॉक्टरवर 27 वर्षीय महिला रुग्णावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर डॉक्टरने महिला रुग्णाचे आक्षेपार्ह व्हिडीओही प्रसिद्ध केले आहे. याच व्हिडीओच्या आधारे डॉक्टरने पीडीत महिला रुग्णाला ब्लॅकमेल केले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, डॉक्टरने फसवून बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ शूट करून ब्लॅकमेल करत होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली असून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like