क्रिकेट मॅचवर ‘सट्टा’ घेणारा पोलीस उपनिरीक्षकच पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विश्वचषक सामन्या दरम्यान सट्टा घेणाऱ्यांवर मुंबई पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सट्टाबाजांना अटक केली होती. तर माहिममध्ये अशीच कारवाई करण्यात आली. धक्कादयाक बाब म्हणजे माहिममध्ये पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकाला त्याच ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकच सट्टा घेताना आढळला. त्यामुळे पोलीस ही चक्रावून गेले.

मंगळवारी इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु होता. यावेळी दादर रेल्वे स्थानकाजवळील रामी ग्सेट लाईन हॉटेलमध्ये सट्टा घेण्यात येत असून सट्टेबाजांची टोळी या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस जेव्हा धाड टाकायला गेले तेव्हा त्यांना पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे (वय-३१) हाच सट्टा घेताना आढळून आला. पोलिसांनी खरमाटेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर खरमाटे हा भायखळा पोलीस ठाण्यात कार्य़रत आहे. खरमाटे याच्यासह मिखिन शाह आणि अन्य दोघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या धाडीत १ लाख ९३ हजार रुपयांचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्यांना कुर्ला न्यायालयात हजर केले असता सर्वांना जामीनावर सोडण्यात आले.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक