arrested TV actresses | चोरीच्या प्रकरणात 2 अभिनेत्रींना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  पेईंग गेस्टमधून (Paying Guest) 3 लाख 28 हजारांची चोरी करणा-या छोट्या पडद्यावरील दोन अभिनेत्रींना (TV actresses) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली (arrested TV actresses ) आहे. अभिनेत्रींनी केलेली चोरी सीसीटीव्ही (CCTV Footage) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अटक केलेल्या दोघीही प्रसिद्ध टीव्ही शो क्राईम पेट्रोल (Crime Petrol) आणि काही अन्य क्राईम शोमध्ये भूमिका साकारतात. arrested TV actresses | mumbai police arrested two tv actresses for theft in aarey colony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

लॉकडाऊनमुळे (lockdown) सीरियलची शूटिंग बंद असल्याने दोघींनाही आर्थिक चणचण भासत होती.
त्यामुळे त्यांनी चक्क चोरीचा मार्ग निवडला आहे.
आरोपी अभिनेत्रींचा एक मित्र आरे कॉलनीत पेइंग गेस्ट चालवतो.
काही दिवसांपूर्वी या दोघीही तिथे राहण्यासाठी आल्या होत्या.
या पेइंग गेस्टमध्ये आधीपासून एक तरुणी राहत होती.
त्या तरुणीचे 3 लाख रुपये चोरुन या दोघी पसार झाल्या.
तक्रारीनंतर पोलिसांनी दोघींचा शोध घेऊन अभिनेत्रींना अटक केली आहे.
या दोघींनी पेइंग गेस्टमधून तब्बल 3 लाख 28 हजाराची चोरी (Theft of 3 lakh 28 thousand) केली होती.
चोरी करून या दोघी आरे कॉलनीतील रॉयल पाम भागातल्या एका पॉश इमारतीत पेइंग गेस्ट बनून गेल्या होत्या. त्या
नंतर ही घटना उघडकीस आली. चोरीची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे हाती लागले. त्या आधारे या अभिनेत्रींना अटक केली आहे.

 

Web Title : mumbai police arrested TV actresses | mumbai police arrested two tv actresses for theft in aarey colony

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Police Property Cell । विविध चोरीच्या घटनांमध्ये मुंबईतील महिलेलाआतापर्यंत 50 वेळा अटक