मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) नियंत्रण कक्षात फोन करुन 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट (Bomb Blast) घडवून आणण्याची धमकी (Threat) देण्यात आली आहे. फोन करणाऱ्याने मुंबईत दोन महिन्यानंतर माहिम, भंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा या ठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचे पोलिसांना सांगितले. यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) खात्यातील सगळ्याच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांना (Mumbai Police) सांगितले की, शहरात दंगल घडवण्यासाठी इतर राज्यातून बऱ्याच लोकांना बोलावण्यात आले आहे. हे बॉम्बस्फोट 1993 प्रमाणे मुंबईत होणार असल्याचा दावा फोन करणाऱ्या व्यक्तीने केला होता. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (Control Room) शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास आला होता.
या फोननंतर मुंबई पोलिसांनी याबाबत एटीएसला (Mumbai ATS) माहिती दिल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली.
त्यानंतर जूहू युनिटच्या पथकाने नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला (वय-55)
याला मालाड रेल्वे स्थानक (Malad Railway Station) परिसरातून अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या लाला विरुद्ध मुंबईमध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे 12 गुन्हे दाखल
असून 2021 मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे (Malad Police Station) मार्फत तडीपार करण्यात आले होते.
एटीएसच्या पथकाने आरोपीला आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या (Azad Maidan Police Station)
ताब्यात दिले आहे. आरोपीने फोनवरुन अशी धमकी का दिली हे अद्याप समजू शकले नाही.
Web Title :- Mumbai Police | bomb blast like 1993 will happen in mumbai again threat call to mumbai police arrest one
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chitra Wagh | महिला आयोगाच्या नोटीशीला चित्रा वाघ यांच्या उत्तर; ट्वीट करत म्हणाल्या…