Mumbai Police Commissioner | ‘जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्यांकडून आधी मेडिकल रिपोर्ट मागू नये, उपचारास मदत करा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) हेमंत नगराळे (Hemant Nagarale) यांनी एक महत्वपूर्ण आदेश काढला आहे. जखमी अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्यांना अगोदर वैद्यकीय अहवाल अर्थात मेडिकल रिपोर्ट (Medical report) मागू नये.
जखमी अवस्थेत तक्रार नोंदवण्यासाठी येणाऱ्या विषयी अधिकाधिक संवेदनशील राहण्याचे निर्देश (Instructions) देखील पोलीस आयुक्तांनी (mumbai police commissioner) दिले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

जखमी अवस्थेत असणाऱ्या त्या व्यक्तीला मेडिकल रिपोर्ट (Medical report) न मागता त्यांना अगोदर तात्काळ उपचार कसा मिळेल याला प्राधान्य दिलं पाहिजे.
तसेच त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करून आणि त्या व्यक्तीसोबत एक पोलीस ठाणे अमलदार देखील पाठवावा.
या आदेशाचं जे कर्मचारी पालन करणार नाहीत.
त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलीस आयुक्त नगराळे (Hemant Nagarale) यांनी म्हटलं आहे.
medical report should not be sought from those who come to lodge a complaint in case of injury orders mumbai cp hemant nagrale पोलीस आयुक्त नगराळे (mumbai cp Hemant Nagarale) म्हणाले,
जर कोणी जखमी व्यक्ती तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात येते.

त्यावेळी त्यांची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी आणि त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्याकडे अगोदर वैद्यकीय अहवाल अर्थात मेडिकल रिपोर्ट (Medical report) मागितला जातो,
आणि तो देखील त्यांनी स्वत: हॉस्पिटलमध्ये जाऊन करुन घेण्यास त्यांना सांगितले जाते.
असं समोर निदर्शनास दिसून आलं आहे.
तसेच, अशा कार्यामुळे तक्रारदाराच्या मनावर पोलिसांबाबत अनेक वाईट प्रभाव पडू शकतो.
यामुळे कधीकधी तक्रार दाखल करायला येणारे व्यक्ती पोलीस ठाण्यात येत नाहीत.
ही गोष्ट नागरिक आणि पोलिसांच्या समन्वयासाठी योग्य नाही, असं स्पष्ट मत पोलीस आयुक्त नगराळे (Hemant Nagarale) यांनी काढलेल्या आदेशात नमूद केलं आहे.

पुढे त्या आदेशात म्हटलं आहे.
की ,यापुढे पोलीस ठाण्यात येणाऱ्या जखमी व्यक्तीला पोलीस हे वैद्यकीय तपासणीसाठी मेमो देतील, तसेच पोलीस ठाण्याच्या वहीमध्ये नोंद करतील.
त्यानंतर जखमी व्यक्तीसह पोलीस हवालदार उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवावं.
यानंतर कायदेशीर प्रक्रियेस पुढे जावे.
पोलीस आयुक्तांच्या अशा निर्णयामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यामधला आदर, विश्वास, समन्वय आणि जवळीकही वाढेल.
असा विश्वास देखील पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
या दरम्यान, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagarale) यांनी काढलेला आदेश हे सर्व पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा, सर्व पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना पाठवले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Mumbai Police Commissioner | medical report should not be sought from those who come to lodge a complaint in case of injury orders mumbai cp hemant nagrale

 

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा