काय सांगता ! होय, मुंबईत पोलिसानेच घातला सराफाला 1.25 कोटींचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   पोलिसानंच ज्वेलरची (Jeweller) फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतल्या भायखळा भागात ही घटना घडली. तब्बल पोलिसानंच ज्वेलरची (Jeweller) १ कोटी २५ लाखांची फसवणूक  केल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलिसासह तीन जणांना अटक केली आहे. खलील कादर शेख (४७), त्याचे साथीदार रविंद्र कुंचिकुर्वे (३६), संतोष नकटे (२७) अशी आरोपींची नवे आहेत. त्यातील एक जण लालबाग परिसरातल्या एका ज्वेलरच्या (Jeweler) दुकानातील मॅनेजर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra : 8 वर्षाच्या मुलाकडून साफ करून घेतले कोरोना रूग्णांचे टॉयलेट, वायरल झालाव्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

भायखळा पोलीस कॉलनीजवळ सोमवारी संध्याकाळी ज्वेलर्सचे मालक भरत जैन (५६) त्यांच्या साथीदारांसह दुचाकीवरुन सोन्याचे बार वितरीत करण्यासाठी जात होते.
मात्र ते जात असताना त्यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवलं त्यातल्या एकानं पोलिसांचा गणवेश घातला होता.
आरोपींनी जैन यांची गाडी अडवली त्यांच्या साथीदाराला गाडीचे कागदपत्रे दाखवण्यास सांगितले.
आरोपींपैकी एक जण कागदपत्र तपासत असताना दुसर्‍या आरोपीनं त्यांच्याकडील सोन्याचे बार असलेली बॅग हिसकावली आणि पळून गेला.
या सर्व प्रकारानंतर जैन आणि त्यांचा सहकारी यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.

फायजर-मॉडर्नानंतर आता सीरमने मागितली कायदेशीर कारवाईतून सूट, म्हटले – ‘सर्वांसाठी असावा एकच नियम’

या प्रकरणाची गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने याची चौकशी सुरू केली होती.
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेल्या दोन वाहनांच्या नंबर प्लेटची तपासणी केली.
यानंतर पोलिसांनी संशयितांची चौकशी करण्यास सुरुवात केली. आरोपींकडून पोलिसांनी दोन दुचाकी, चार मोबाइल फोन आणि १,०४५ ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नायगावमधील स्थानिक शस्त्रे युनिट पोलीस हवालदार शेख यांचा समावेश होता.
तपास केल्यानंतर संपूर्ण घडलेला प्रकार उघडकीस आला.

Nagar : भाजपा पदाधिकाऱ्यांची भूमिका, म्हणाले – ‘महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहू, आता राष्ट्रवादीचा पाठिंबा नको’

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

3 जून राशीफळ : आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या