Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांकडून 24 किलो चरस जप्त, 2 महिलांसह चौघांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मागील आठवड्यात मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police Crime Branch) अँटी नार्कोटिक्स पथकाने (Anti-narcotics cell) सायन परिसरातून एका ड्रग्स तस्कर महिलेला (Drug smuggler woman) अटक केली होती. या महिलेकडे तब्बल 21 कोटी रुपयांचे 7 किलो हिरोईन (Heroin) जप्त केले होते. या ड्रग्स तस्करी प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता राजस्थानशी संबंधित आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. मुंबई क्राईम ब्रांचने (Mumbai Crime Branch) दहिसर येथे मोठी करावी केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने (Mumbai Police Crime Branch) 24 किलो चरस जप्त केले आहे.

 

मुंबई क्राइम ब्राँचने (Mumbai Police Crime Branch) दहिसर चेक नाक्याजवळ (Dahisar checkpoint) मोठी कारवाई करत 24 किलो चरस जप्त (24 KG Charas seized) केलं आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 महिलांसह चौघांना अटक (4 arrest) केली आहे.
हे आरोपी राजस्थानातून (Rajasthan) रस्त्याच्या मार्गाने चरस मुंबईला घेऊन येत होते.
मागील महिन्याभरापासून दहिसर चेक नाक्याजवळ सापळा रचून बसल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांनी पकडलेल्या 24 किलो चरसची बाजारातील किंमत तब्बल 1 कोटी 44 लाख रुपये असल्याचे सुत्रांनी सांगितले.

क्राइम ब्रांच पोलिसांनी चरस तस्करी प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेले सर्व आरोपी पवई परिसरातील रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी देखील राजस्थानातून रस्त्याच्या मार्गाने मुंबईत चरस आणले असल्याच संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
चारही आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरु आहे.
या कारवाई संदर्भात माहिती देण्यासाठी क्राइम ब्रांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे (DCP Datta Nalawade) पत्रकार परिषद घेणार आहेत.

 

Web Title : Mumbai Police Crime Branch | 24 kg charas seized and 4 arrested including 2 woman smugglers by mumbai crime branch Anti narcotics cell

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | खूशखबर ! सोन्याचे दर पुन्हा उतरले; 8059 रुपयांनी ‘स्वस्त’, जाणून घ्या

Dr. Baba Adhav | ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना 92 व्या वर्षी कॅन्सर, केले ‘हे’ आवाहन

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिक यांच्या आरोपानंतर आणखी एका मंत्र्याचा पाठिंबा, फोटो ट्विट करत विचारला ‘हा’ सवाल