प्रसिध्द चित्रपट निर्माता मुंबई पोलसांच्या गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने प्रसिद्ध चित्रपट निर्माता अजय यादवला बेड्या ठोकल्या आहेत. कोट्यवधी रुपयांचा फायनान्स उपलब्ध करुन देवू शकतो, असे सांगून ८ ते १० लोकांचे कोट्यवधी पैसे बुडविल्याचा आरोप त्याच्यावर असून याच फसवणुकीच्या पैशातून तो चित्रपट बनवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अजय यादवला याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भडास, ओव्हर टाइम, लव्ह फिर कभी, रण बंका, सस्पेन्स आणि साक्षी अश्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शनअजय यादव केले. दरम्यान, चित्रपट फ्लॉप झाले असले तरी अजय यादवने आपली एक वेगळी छाप बाॅलिवूडमध्ये सोडली. नवीन कलाकारांना काम देणारा निर्माता/दिग्दर्शक अशी ओळख अजयची झाली होती. मात्र, आता उघड झालेल्या प्रकरणामुळे फसवणूक करणारा चित्रपट निर्माता अशी ओळख त्याची बनली आहे. बाॅलिवूडमध्ये नाव असल्याचा फायदा घेत आपण कोट्यवधी रुपयांचा फायनान्स उपलब्ध करुन देवू शकतो, माझी एक एंग्लो फायनान्स इंटरप्रायजेस कंपनी आहे. असं सांगून या चित्रपट निर्मात्याने जवळपास ८ ते १० लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

साईनाथ स्पिरीट कंपनीला २०० कोटी रुपयांची आर्थिक मदत हवी असल्याची माहिती अजय यादवला मिळाली होती. ही कंपनी आपल्याकडे आर्थिक सहाय्याकरता येईल, असा सापळा अजयने रचत अगदी कमी व्याजदरात आणि कमी वेळात तुम्हाला २०० कोटी रुपये आर्थिक पुरवठा देतो, मात्र यासाठी १५ लाख रुपये द्या, असं अजय यादवने कंपनीला सांगितलं.

दरम्यान, यादव हा २०११ पासून बाॅलिवूडमध्ये सक्रिय आहे. या माध्यमातून त्याने अनेक बड्या निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि फायनान्सरशी जवळीक बनवली होती. यातील अनेकांची अजयने फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे यादवकडून फसवणूक झालेल्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी यावेळी केलं.