Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणार्‍याला बंगळुरूमधून अटक, समोर आलं सुशांतसिंग ‘कनेक्शन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray | पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाला अटक करण्यात मुंबईच्या सायबर सेल (Mumbai Police Crime Branch Cyber Team) पथकाला यश मिळाले आहे. बंगळुरू (Bengaluru) येथे बंगळुरूच्या पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली असून अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा तो चाहता (sushant singh rajput fan) असल्याचे समोर आले. जयसिंग राजपूत Jaisingh Rajput (वय ३४) असं त्याचं नाव असून सुशांतसिंगच्या मृत्युमुळे जयसिंगला दुःख झाले होते. त्यातूनच हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगतिले. (Man held in Bengaluru for threatening Maharashtra Minister Aaditya Thackeray)

 

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना ८ डिसेंबरला मध्यरात्री त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) जयसिंग राजपूतने संदेश पाठवला होता. त्यामध्ये त्याने सुशांतसिंगच्या मृत्यूबाबत आरोप केले होते. इतकंच नाही तर त्याने आदित्य ठाकरेंना तीन फोनही केले. त्यांना फोनवरून, मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार सायबर पथकाने तपासाला सुरुवात केली. जयसिंग राजपूतच्या मोबाईल नंबरवरुन त्याचा शोध घेतला, तो बंगळुरू येथे असल्याचं समजले. त्यानंतर, मुंबई पोलिसांनी बंगळुरू येथे जाऊन त्याला अटक केली. जयसिंग राजपूतवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार बंगळुरू पोलीस पथकाने १८ डिसेंबरलाच जयसिंग राजपूतला अटक केली होती.

 

Web Title :- Mumbai Police Crime Branch Cyber Team arrested Jaisingh Rajput for threatening kill aditya thackeray bengluru sushant singh connection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा