Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police Crime Branch | मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. मुंबई क्राईम ब्रँचने (Mumbai Police Crime Branch) दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा (Fake Indian Currency) जप्त करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्ये आजपर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

 

मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रँचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी रुपयांच्या नोटा मुंबई बाजारात (Mumbai Market) चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता. पण पोलिसांनी वेळीच त्यांचा हा डाव उधळून लावला आहे. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी (International Gang) आहे. या आरोपींकडून 7 मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार (DCP Sangramsinh Nishandar) यांनी सांगितले की,
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 7 कोटी रुपयांच्या 2000 च्या बनावट भारतीय चलनातील नोटा जप्त केल्या आहेत.
याप्रकरणात 7 जणांना अटक (Arrest) केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असतान
न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

 

Web Title :- Mumbai Police Crime Branch | Mumbai Police Crime Branch arrested 7 persons with fake Indian currency notes of 2000 denominations having a face value of Rs 7 crores

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAN-Aadhaar Link | SBI कडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! हे काम केलं नाही तर तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, जाणून घ्या

 

Hair Care Tips | थंडीत केसांची काळजी कशी घ्याल? वापरा या खास टिप्स, केसही उगवतील घनदाट !

 

Tata Sky | 18 वर्षानंतर बदलणार आहे DTH कंपनी टाटा स्कायचे नाव, आता Tata Play च्या नावाने ओळखली जाईल

 

Pune Crime | पुण्याच्या एरंडवणे येथील ‘हिमाली’ गृहरचना संस्थेत 19 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार, सचिव सुरेश शहा यांच्यासह तिघांवर FIR

 

Bigg Boss 15 | बिग बॉस 15 मध्ये रश्मि देसाईसोबत राखी सावंतनं केलं जोरदार भांडण, रश्मि म्हणाली – शमिता होणार बिग बॉस 15ची विजेती…

 

Pune Crime | पुण्यातील 27 वर्षीय युवतीला खडकवासल्याला नेऊन बलात्कार, तरुणावर FIR