Mumbai Police | पोलिसांनी जप्त केलेल्या स्टोअर रूममधील सिलिंडरचा स्फोट; पोलीस अधिकारी गंभीर जखमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police | पोलीस ठाण्यातील जप्त साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये (Store Room) सोमवारी (दि.12) दुपारी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. ही आग विझवताना एक पोलीस अधिकारी (Police Officer) गंभीर जखमी (Seriously Injured) झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना खेरवाडी पोलीस ठाण्यात (Kherwadi Police Station) घडली आहे. जखमी अधिकाऱ्यावर (Mumbai Police) सायन हॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा स्फोट कसा झाला याची पुष्टी पोलिसांनी अद्याप केलेली नाही.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) परिसरातील खेरवाडी पोलीस ठाण्यात (Mumbai Police) एका खोलीत दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक अरविंद खोत (ASI Arvind Khot) यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेले साहित्य ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये सिलिंडरचा
स्फोट झाला. परंतु याला अधिकृत दुजोरा पोलिसांनी दिलेला नाही.
आम्ही स्फोट कसा झाला हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पोलीस उपायुक्त परिमंडळ-8 दीक्षित गेडाम (DCP Dixit Gedam) यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

Web Title :- Mumbai Police | cylinder explosion in the store room where seized materials are kept in mumbai in police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update