मुंबईच्या महापालिकेकडून मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यानंतर आता मुंबई पोलीसही ‘डिफॉल्टर’ यादीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पाण्याच्या बिलाची रक्कम थकविल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाला बृहन्मुंबई महानगरपालिकेने डिफॉल्टर घोषित केले होते. यानंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई पोलीस विभागालासुद्धा डिफॉल्टर यादीत टाकले आहे. आरटीआय कार्यकर्ता शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेल्या माहितीत ही गोष्ट समोर आली आहे. पोलीस विभागाने तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी केली आहे. सामान्य नागरिकांनी थोडे जरी पाणीबिल थकवले तरी त्याच्यावर ताबडतोब कारवाई करणारी बृहन्मुंबई महानगरपालिका अशा वेळी शांत का बसते ? असा संतप्त सवाल मुंबईकर उपस्थितीत करत आहेत.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. या माहिती संदर्भात जनसंपर्क माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांना माहिती दिलेली आहे. या माहितीत पोलीस विभागाकडे तब्बल ९३ कोटी ८५ लाख ७९ हजार १५१ रुपयांची थकबाकी असून पोलीस विभागाचे एकूण ४६६ जलजोडणीला डिफॉल्टर यादीत टाकले असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बृहन्मुंबई पोलीस आयुक्त मुख्यालय, पोलीस निदेशक कार्यालय, अनेक पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे, जीआरपी, वाहतूक पोलीस कार्यालय, पोलीस वसाहतीचा समावेश आहे.

यापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण ८ कोटींची थकबाकी होता. तसेच त्या बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले होते. याबाबत वृत्त आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागांनी जवळपास सर्व थकबाकीचे पैसे पालिकेकडे भरण्यात आले आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी सांगितले की, जर शासकीय विभाग पाण्याची थकबाकी वेळेवर भरत नसेल तर सामान्य नागरिकांनी तरी का भरावे ? तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस विभागाच्या पाण्याच्या थकबाकीचे पैसे देखील भरणार का ? असा सवाल शकील अहमद शेख यांनी उपस्थित केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like