Mumbai Police | पोलीस निरीक्षकाचे CP संजय पांडे यांना पत्र; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police | व्यापारी जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा (Mumbai High Court) दिलासा मिळाला आहे.
त्यांच्याविरोधात मारहाण आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
दरम्यान, यावर आता मुंबई पोलिस निरीक्षक अनूप डांगे (Police Inspector Anoop Dange) यांनी थेट मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांना पत्र लिहिले आहे.
ज्यात मुंबई पोलिसांनी आता हाय कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घ्यावी,
असं म्हटलं आहे. (Mumbai Police)

 

”12 एप्रिल 2022 रोजी मुंबई हाय कोर्टाने व्यापारी जितेंद्र नवलानी उर्फ जितू नवलानी यांच्याविरुद्ध एफआयआर (FIR) रद्द करण्याचे आदेश दिले, त्यावर मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात यावी.
डांगे यांनी आरोप केलेत की,
या प्रकरणाचे तपास अधिकारी निरीक्षक किशोर शिंदे (Kishor Shinde) यांनी या प्रकरणाचा योग्यरितीने तपास केला नाही,
तसेच गावदेवी विभागाचे एसीपी किरण काळे (ACP Kiran Kale) यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी मुद्दाम जितेंद्र नवलानीला फायदा करून देण्यासाठी वेगवेगळ्या कमतरता ठेवल्या.
आणि त्याच्या आधारे हा गुन्हा रद्द करण्याचे आदेश हाय कोर्टाने दिले.”
असं डांगे यांनी पत्रात म्हटलं आहे.

पुढे या पत्रात म्हटलंय की,”2019 मध्ये मुंबई पोलिसांनी जितेंद्र नवलानीच्या बारवर छापा टाकला तेव्हा जितेंद्र नवलानी यांनी पोलिसांना त्यांचे काम करण्यापासून रोखले आणि त्याच आरोपावरून गावदेवी पोलीस ठाण्यात (Gavdevi Police Station) त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.
एफआयआर 12 एप्रिल रोजी मुंबई हाय कोर्टाने रद्द केला होता.
जितेंद्र नवलानी यांना फायदा व्हावा यासाठी तपास अधिकार्‍यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश आणि कायद्याने घालून दिलेले नियम जाणूनबुजून धुडकावून लावल्याचे,” देखील डांगे यांनी सांगितले.

 

Web Title :- Mumbai Police | inspector of police anoop dange s letter to commissioner of police
mumbai police should apeal in supreme court against jitendra navlani

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा