Ola कॅबचालकाचा मांढरदेव घाटात खून ?

वाई (जि. सातारा) : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या 3 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ठाणे येथील ओला कॅबचालकाचा मांढरदेव घाटात खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या माेबाईलवरील लोकेशननुसार मुंबई पाेलिस त्यास शाेधत हाेते. दरम्यान संबंधित तरुणाचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.

मांढरदेव (ता. वाई) येथे मंगळवारी (दि..29) सकाळी 10.30 च्या सुमारास एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. दरम्यान युवकाचा घातपात करून खून झाल्याची चर्चा परिसरात सुरू होती. याबाबत पोलिस पाटील जयश्री सुनील मांढरे यांनी वाई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मांढरदेव गावापासून एक किलोमीटर अंतरावर काळुबाईची जाळी जुने ठाणे’ या ठिकाणी वाई- मांढरदेव रस्त्यावरील भोर बाजूच्या पुलाच्या डाव्या बाजूस दरीत मृतदेह आढळला आहे. त्यांचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, रंग सावळा, बांधा मजबूत आहे. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताचे डाग दिसून येत असून, पोटावर खरचटलेले आहे. मृतदेहाच्या गळ्यात लाल रंगाचा दोरा आहे. पोलिस नाईक एस. एस. वायदंडे तपास करीत आहेत.