Coronavirus : मुंबई पोलिस दलातील उपायुक्ताला ‘कोरोना’ची लागण झाल्याचा संशय, लीलावतीत दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं असून आतापर्यंत हजारो जणांचे बळी गेले आहेत. भारतात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. महाराष्ट्रात देखील 12 हून अधिक जणांचे बळी कोरोनामुळं गेले आहेत. दरम्यान, आज (शुक्रवारी) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस दलातील एका उपायुक्ताला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे संबंधित उपायुक्तांना तात्काळ लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कालच एका पोलिस कर्मचार्‍याला कोरोना व्हायरस झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पोलिस उपायुक्तांचे संपुर्ण कार्यालयच क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अधिकार्‍यास कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही याबाबतचे अहवाल अद्याप प्राप्त झालेली नाही. दरम्यान, खबरदारी म्हणून त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करण्याचे काम सुरू आहे.