दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत ‘हाय अलर्ट’ !

मुंबई : दिल्लीत इस्त्रायल दूतावासाजवळ स्फोट झाल्यानंतर आता मुंबईत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी ट्विट करून दिली.

दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे तीन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. या स्फोटामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. इस्त्रायल दूतावासाजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या परिसरात IED चा मोठा साठा पोलिसांना मिळाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. पोलिस यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सर्व विमानतळे, सरकारी इमारतींसाठी अलर्ट जारी

दिल्लीतील घटनेनंतर सर्व विमानतळे, महत्वाच्या ठिकाणी आणि सरकारी इमारतींसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने चोख व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय पथकाने दिली आहे.