‘मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस’, उच्च न्यायालयानं केलं कौतुक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई उच्च न्यायालयानं (HIGH COURT OF BOMBAY) मुंबई पोलीस (Mumbai Police) हे जगातील सर्वोत्तम पोलीस खाते असल्याचं मत नोंदवलं आहे. कोरोनाच्या (Corona) काळात अगदी प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी आपलं कर्तव्य चोख बजावल्याचं शुक्रवारी एका सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं आहे. जगात मुंबईत पोलीस सर्वोत्कृष्ट मानले जातात त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी (Scotland Yard Police) केली जाते असंही न्यायालयानं म्हटलं आहे. नवी मुंबईमधील रहिवासी सुनैना होले यांच्यावर दाखल झालेल्या 3 एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयानं मुंबई पोलिसांची स्तुती केली आहे.

सुनैना होले यांनी सोशल मीडियावरून टीका केली होती. टीका केल्यानं समाजातील गटांमध्ये तेढ निर्माण होईल. या विरोधात दाखल झालेल्या 3 एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायायानं म्हटलं की, “मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस खाते आहे. लॉकडाऊन असताना त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं. कोरोना महमारीच्या काळात ताण असतानाही पोलीस अधिकारी-कर्मचारी 12 तस सेवा बजावत आहेत. त्यांची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते.”

न्यायमुर्ती एस. एस .शिंदे आणि न्यायमुर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठानं गुरुवारी सांगितलं की, मुंबई पोलिसांची कामगिरी उत्तम असून पोलिसांना जनतेनं सहकार्य केलं पाहिजे.