Mumbai Police Issues Notice To Navneet Ravi Rana | राणा दाम्पत्याचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ‘गुंगारा’ अन् गनिमी कावा; मुंबईतील खार निवासस्थानी पोहचल्यानंतर मुंबई पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police Issues Notice To Navneet Ravi Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) या मुंबईत (Mumbai) दाखल झाल्या आहेत. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठणासाठी त्यांनी शिवसेनेला (Shivsena) आव्हान दिलं आहे. त्यानुसार राणा दाम्पत्य (Navneet Rana & Ravi Rana) मुंबईत दाखल होणार होतं मात्र दुसरीकडे शिवसेनेने खास फिल्डिंग लावली होती. मात्र राणा दाम्पत्य शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना गुंगारा देत मुंबईमध्ये सुरक्षितपणे दाखल झालं आहे. (Mumbai Police Issues Notice To Navneet Ravi Rana)

 

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसेनेचा विरोध लक्षात घेत विदर्भ एक्सप्रेसने (Vidarbha Express) न येता त्यांनी विमानाने येण्याचा निर्णय घेतला. राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार (Khar) येथील नंदगिरी गेस्टहाऊसवर (Nandgiri Guesthouse) असल्याची माहिती समजत आहे. याबाबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ही माहिती सजमताच त्यांनी नंदगिरी गेस्टहाऊस बाहेर टाळ वाजवत भजन करत हनुमान चालिसा म्हणत गर्दी केली.

मुंबई पोलिसांनीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे (IPS Manjunath Shinde) यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना 149 ची नोटीस (Notice) बजावली आहे. दुसरीकडे ‘मातोश्री’ बाहेर (Matoshree) खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), खासदार अनिल देसाई (Anil Desai) आणि युवा सेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) आले आहेत.

 

नवनीत राणा काय म्हणाल्या होत्या ?
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री (CM) झाल्यापासून महाराष्ट्रात संकट वाढली असून ते घराच्या बाहेर निघत नाहीत.
त्यामुळे त्यांनी हनुमान चालिसा वाचावी.
आमच्यासाठी मातोश्री श्रद्धास्थान असून आम्ही अत्यंत श्रद्धेने अमरावती ते मातोश्री अशी वारी करू.
आम्ही शांतपणे जाऊन हनुमान चालिसाचं वाचन करू, असं नवनीत राणा यांनी म्हटलं होतं.

 

Web Title :- Mumbai Police Issues Notice To Navneet Ravi Rana | mumbai police issues notice to rana couple khars residence

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा