Mumbai Police | 2 महिन्याच्या चिमुकलीचे फूटपाथवरुन अपहरण, मुंबई पोलिसांकडून 12 तासांत आरोपीला अटक; बाळ पुन्हा आईच्या कुशीत

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – बुधवार (दि. 26) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आझाद मैदान (Azad Maidan) परिसरातील सेंट झेव्हियर्स कॉलेज समोरील फुटपाथवर राहणाऱ्या कुटुंबातील एका 2 महिन्यांच्या मुलीचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 8 पथके रवाना करत शोधमोहीम सुरु केली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने दोन आरोपीचा माग काढत त्यांना अटक केली. यासंदर्भात मुंबईचे पोलीस (Mumbai Police) आयुक्त विवेक फणसळकर (CP Vivek Phansalkar) यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

बुधवार (दि. 26 ऑक्टोबर) रोजी मध्यरात्रीच्या आसपास सेंट झेव्हियर्स कॉलजच्या समोर एक शौचालय आहे. या शौचालयाला लागून असलेल्या फुटपाथवर एक कुटुंब राहते. त्यांच्या कुटुंबात एकूण तीन मुले आहेत. त्यापैकी सर्वात लहान 2 महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाले. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांत (Mumbai Police) धाव घेतली. आझाद मैदान पोलीस ठाण्यात (Maidan Police Station) त्यांनी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला.

याप्रकरणी आरोपी मोहम्मद हानीफ (Mohammad Hanif) याला अटक केली आहे.
आरोपीने यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना आहे.
आरोपीला वडाळा संगमनेर परिसरातून ताब्यात घेऊन मुलीची सुटका केली.
आज सकाळी 6 च्या सुमारास पोलिसांनी वडाळा संगमनगर परिसरातून मुलीचे अपहरण करणारा व
आणखी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी आयपीसी 363 कलमांतर्गत
गुन्हा दाखल केलेला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title :- Mumbai Police | Kidnapping of 2-month-old girl from footpath, accused arrested by Mumbai Police within 12 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chin Hair | महिलांच्या हनुवटीवर केस येणे असू शकतो ‘या’ आजारांचा संकेत, जाणून घ्या कोणते

Gulshan Grover | बॉलिवूड अभिनेते माझाच लूक कॉपी करतात; अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या वक्तव्याची बॉलिवूडमध्ये चर्चा