Mumbai Police | कडक सॅल्यूट ! भर पावसात जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसापासून मुबंईत पावसाची दाणदाण होत आहे. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक कोंडी झाली आहे. परिसरात पावसाच्या पाण्यानं जलमय केलं आहे. तर दुसरीकडे याच पावसाने अनेक जीर्ण इमारती कोसळल्या आहेत. भिंती पडल्या आहेत. यामुळे मोठी दुर्घटना झाली आहे. अशा या पावसाच्या गोंधळात देखील मुंबई पोलीस प्रशासन (Mumbai Police Administration) आणि महानगरपालिकेचे (BMC) कर्मचारी अतोनात झटत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. पडत्या पावसात अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहेत. तर, अशातच एक मुंबई पोलीस (Mumbai Police) कर्मचाऱ्याची कर्तव्याची तत्परता दिसून आलीय. याबाबत एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

Mumbai Police | mumbai police naik rajendra shegar help injured father and his daughter reach to safety

व्हायरल झालेल्या व्हिडिओत मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) एक कर्मचारी जखमी झालेल्या बापलेकीला भल्या पावसात पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी आम्ही ड्युटीवर आहोत याची जाणीव देखील करून दिली आहे. तर, संबंधित बापलेकीला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव राजेंद्र शेगर (Police Naik Rajendra Shegar) आहे. ते पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची ड्युटी कांदीवली वाहतूक पोलिसांत (Kandivali Traffic Police) आहे. तर काल झालेल्या जोरदार पावसामुळे कांदवली ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाण्यानं जलमय केलं आहे. रस्ते, परिसर पाण्यानं तुडुंब झाली आहेत. असं मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने भर पावसात भिजत बापलेकीच्या मदतीला धावून गेले आहेत.

दरम्यान, भर पावसात एक जखमी व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन पाण्यातून वाट शोधत असल्याचं पोलीस नाईक राजेंद्र शेगर (Police Naik Rajendra Shegar) यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ त्यांना मदतीचा हात दिला आहे. आणि लहान मुलीला उचलून घेत, दोघांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होताना दिसत आहे. अनेकजण पोलीस नाईक राजेंद्र शेगर (Police Naik Rajendra Shegar) यांच्या कामाचं सर्वत्र कौतुक करत त्यांची कर्तव्यनिष्ठेला सलाम (Salute) करत आहेत.

हे देखील वाचा

PM Modi | सर्व पक्षांच्या प्रमुखांना PM नरेंद्र मोदी देणार कोरोनासंबंधीची सविस्तर माहिती; पंतप्रधानांची ग्वाही

Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वर पाणीच पाणी; पेणमध्ये गणेशमूर्ती पाण्यात?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mumbai Police | mumbai police naik rajendra shegar help injured father and his daughter reach to safety

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update