Mumbai Police News | पोलीस शिपायाकडून महिला पोलीस शिपाईसोबत गैरवर्तन, मानसिक त्रास देऊन बदनामी करण्याची धमकी; मुंबई पोलीस दलातील प्रकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Police News | मुंबई पोलीस दलातील एका पोलीस शिपायाने महिला पोलीस शिपाई (Female Police Constable) सोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिला पोलिसाने अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात (Antop Hill Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी पोलीस शिपायाविरुद्ध आयपीसी ३५४, ३५४ (आय), ३५४(क),५०९, ५०४, ५०६ गुन्हा दाखल केला आहे. (Mumbai Police News)

आरोपी आणि फिर्य़ादी हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. आरोपी वारंवार मानसिक आणि शाररीक त्रास देत असल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेला तिच्या पतीची बदनाम करण्याची तसेच शिवीगाळ करुन नोकरी घालवण्याची धमकी दिली, असं फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. (Mumbai Police News)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या नावे फसवणूक

महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगत एका इंजिनिअर महिलेला सायबर चोरट्यांनी गंडा (Cheating Fraud Case) घातला आहे. अनोळखी आरोपीने पीडित महिलेच्या फोनवर फोन करत आपण एनसीबी मधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे घेत महिलेकडून 5 लाख 85 हजार रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने वनराई पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Firing News | धक्कादायक! पुण्यात सराफा व्यवसायिकावर गोळीबार करुन दागिन्यांची बॅग पळवली, हल्लेखोरांनी झाडल्या 6 गोळ्या

Pune Crime News | ट्रेडिंगमधून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील तरुणीची फसवणूक

Pune PMC News | महापालिका प्रशासनाच्या अनियोजीत कामांचा भुर्दंड ‘लाखांमध्ये’

Crime News | कंपनीत पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांची कोट्यवधीची फसवणूक, पुण्यातील प्रकार

NCP Hearing Today in Supreme Court | राष्ट्रवादी पक्ष कुणाचा?; निवडणूक आयोगासमोर आज दुपारी सुनावणी, शरद पवार उपस्थित राहणार

Pune Crime News | बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन घेण्याचा प्रयत्न, पुणे धर्मादाय आयुक्त कार्य़ालयातील 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल