पोलिसांकडून 50 बारबालांची भर रस्त्यावरून ‘परेड’, व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यानं प्रचंड ‘खळबळ’, एसपींचे चौकशीचे आदेश

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यपान करणाऱ्या ठिकाणी नाचणाऱ्या किंवा एखाद्या बारमध्ये नाचणाऱ्या अनेक बारबालांचे व्हायरल व्हिडीओ आपण खूपदा पाहिले असावेत. मात्र नुकताच पोलिसांनी एका बारवर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या बारबालांची भर रस्त्यातच परेड काढल्याचे पहायला मिळाले.

बारबालांमध्ये काही बांग्लादेशी तरुणी असल्याचा पोलिसांना संशय होता. बारबालांचा नोकरनामा, नोंदणी आदींचीदेखील पडताळणी या निमित्ताने केली गेली. या बारमधून ताब्यात घेतलेल्या 50 ते 55 बारबालांना पडताळणीसाठी दहिसर चेकनाका येथील पोलीस चौकीत न्यायचे होते. मात्र या भागात मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे खूपच गर्दी झालेली होती तसेच सगळ्या बारबालांना नेण्यासाठी पुरेशी वाहने देखील नव्हती त्यामुळे या बारबालांना रस्त्यावरूनच चालत पोलीस चौकीला नेण्यात आले.

सर्व बारबालांना रस्त्यावरून चौकीला घेऊन जाताना अनेकांनी हा नजारा पाहिला तर अनेकांनी याचा व्हिडीओ देखील काढला. काशिमीरा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक राम भालसिंग आणि त्यांच्या पोलीस पथकाने शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भाईंदरमधील ९ ऑर्केस्ट्रा बारवर धाडी टाकून ही कारवाई केली होती.

वायरल झालेला व्हिडिओ

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-

https://www.facebook.com/105127514202599/videos/439071667028191/?v=439071667028191&external_log_id=9a897616b95fc9ae9ab5ad6de3a684de&q=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fwatch%2F%3Fv%3D439071667028191%26external_log_id%3Da15f61286b17559abb1f8fb2ef9f8634%26q%3Dpolice%2520parade%2520bar%2520girl

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like