नाना पाटेकर, गणेश आचार्य यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, तसेच नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्यसह चित्रपट ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवरील आणखी दोघांविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. निर्माता सामी सिद्धिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांच्यावर ३५४ आणि ५०९ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e378a645-cd07-11e8-9c32-f7447b0e99e0′]

अभिनेत्री तनुश्री दत्ता बुधवारी संध्याकाळी जबाब नोंदविण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे येताना कोणी ओळखू नये, म्हणून तिने बुरखा घातला होता. तिच्या जबाबानंतर या चौघांवरही लवकरच संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती.

या कलाकारांवर झाले आहेत लैंगिक छळाचे आरोप

वकील अ‍ॅड. नितीन सातपुते आणि त्यांच्या आणखी एका वकील सहकाऱ्यासह तनुश्री सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहोचली. मीडियाला टाळण्यासाठी तिने बुरखा परिधान केला होता. गेले दोन दिवस तिचा जबाब नोंदविण्याबाबत चर्चा सुरू होती. पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला नाही, तर न्यायालयात जाण्याचा इशारा तिच्या वकिलांनी दिला होता. तनुश्रीने पोलीस ठाण्यात जबाब दिला. त्यात नाना पाटेकर आणि आचार्य यांच्यासह दिग्दर्शक राकेश सारंग तसेच निर्माता सामी सिध्दिकी यांच्यावरही आरोप केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तनुश्रीला नानासोबत अश्लील दृश्य देण्यास सांगण्यात आले. मात्र चित्रपटाच्या मूळ करारात त्याचा उल्लेखच करण्यात आला नव्हता. तिने या सगळ्याला नकार दिल्याने नंतर तिच्या कारवरही गुंडांमार्फत हल्ला करवला गेला, असा तनुश्रीचा दावा आहे. त्यासंदर्भात तिने ‘मी टू’ मोहिमेंतर्गत सोशल मीडियावर आवाज उठवल्यानंतर हा विषय नव्याने चर्चेत आला.

[amazon_link asins=’B00BULWU2O’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e9697e53-cd07-11e8-812f-b73eb607b3ba’]

‘हॉर्न ओके प्लिज’ च्या सेटवर २००८ साली नाना पाटेकर यांनी लैंगिक छळ केला होता, असा आरोप तिने केला. या प्रकरणी शनिवारी एक लेखी पत्र तिने पोलीस ठाण्यात दिले. त्याची दखल घेत महिला आयोगाने पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली, अशी विचारणा केली होती. तसेच गुरुवारी अ‍ॅड सातपुते यांनी ४० पानी पुरावा पोलीस ठाण्यात वर्ग केला. त्यानंतर पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.