रणवीरच्या ‘गली बॉय’चा उपयोग रस्ता सुरक्षेसाठी : मुंबई पोलिसांची अनोखी शक्कल 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ट्विटरवर आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी रणवीरच्या ‘गली बॉय’ चित्रपटातील  ‘मर जाएगा तू’ या डॉयलॉगवरून प्रवशांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई पोलिसांनी अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही फ्रेम शेअर करत म्हटले आहे की, ज्यावेळी कोणी चालक हेल्मेट न घालता गाडी चालवण्याचे धाडस करेल…तो मुर्ख मुलगा (#SillyBoy) असा हॅश टॅग देऊन कॅप्शन दिली आहे.

@ मुंबईपोलिस’ हा त्यांचा ट्विटर हॅण्डल जसा मुंबईकर आणि पोलिस दल यांतील संवादसेतू आहे, तसाच तो मुंबईकरांचा मार्गदर्शक, सल्लागारही आहे. रस्ता सुरक्षेसाठी मुंबई पोलिस अनेकवेळा विविध उपक्रम राबवत असलेले पाहायला मिळत असतात. या उपक्रमामध्ये अनेक वेळा चित्रपटातील काही फ्रेम्स, तर कधी क्रिकेटमधील नो बॉलचे शॉट घेऊन चालकांना जागृत करत असतात. आताही त्यांनी असाच उपक्रम राबवला आहे. त्यांनी अतरंगी अभिनेत्रा रणवीर सिंहच्या ‘गली बॉय’ या चित्रपटातील एका फ्रेमचा वापर केला आहे.
मुंबई पोलीस ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. विविध सण, दिनविशेष आणि चालू घडामोडींच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याचे काम मुंबई पोलिसांचे ट्विटर हँडल करत असते. मुंबई पोलिसांनी ट्रॅफिकबाबत जागरूकता पसरवण्यासाठी ट्विटरवर शेअर केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर पसंत केले जात आहेत.