‘प्रेयसीला भेटण्यासाठी कोणतं स्टिकर लावू असं विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांनी दिलं मजेदार उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यात कठोर निर्बध लागू केले आहे. यामुळे पोलीस प्रशासनावर अधिक ताण पडला आहे. तसेच राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेशिवाय बाहेर विनाकारण फिरू नये असे नमूद केले असता, या काळात शहरात आवश्यक कामासाठी फिरण्यासाठी गाड्यावर विविध रंगाचे स्टिकर लावण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले. मात्र एक चांगलाच आणि गंमतीशीर प्रश्न ट्विटरद्वारे समोर आला आहे, तर त्याला उत्तर पोलिसांनी दिलंय. पोलिसांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियात व्हायरल झालंय.

लॉकडाऊन दरम्यान शहरात आवश्यक कामानिमित्त फिरण्यासाठी स्टिकरच्या रंगांबाबत लोकांमध्ये संभ्रम असल्यानं याबाबतचे अनेक प्रश्न मुंबई पोलिसांना विचारलं जात आहेत. मात्र, अनेकांना अत्यावश्यक कारण नसताना बाहेर पडल्यास कोणतं स्टिकर लावायचं असा प्रश्न देखील पडला आहे. ट्विटरद्वारे असाच एक विचित्र प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकरास पोलिसांनी उलट भन्नाट उत्तर दिलय. तर अश्विन विनोद नावाच्या एका युवकाने मुंबई पोलिसांना प्रेयसीला भेटण्याबद्दल प्रश्न विचारला होता. ‘मला प्रेयसीला भेटायला जायचं आहे. मला तिची आठवण येते, त्यासाठी माझ्या वाहनावर कोणत्या रंगाचं स्टिकर लावावं लागेल, अशी विचारणा त्यानं केली होती.

त्या प्रश्नावरून असं म्हटलं आहे की, प्रेयसीला भेटणं तुमच्यासाठी गरजेचं आहे हे आम्ही समजू शकतो. परंतु, दुर्दैवानं ही गोष्ट आमच्याकडील अत्यावश्यक सेवांच्या यादीत मोडत नाही, असे मुंबई पोलिसांनी या प्रश्नाला चांगलच आणि मजेदार ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. या प्रश्न आणि उत्तरावरून सोशल मीडियावर हे ट्विट जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, अंतर ठेवल्यानं प्रेम वाढतं आणि सध्याच्या काळात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. हा फक्त एक टप्पा आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवावं ही सदिच्छा, असा भन्नाट उत्तर पोलिसांनी दिला आहे. कोरोनाकाळात मुंबई पोलिसांनी संबंधित तरुणाला असा महत्त्वाचा संदेशही दिला आहे. तर या ट्विटचे लोकांनी लाईक्सनी भरवलं आहे.