पोलिस व्हॅनमध्येच आरोपीनं चावलं कर्मचार्‍याला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नशेच्या धुंदीत गोंधळ घालणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी कसेबसे ताब्यात घेतले आणि गाडीत टाकले. पोलीस या तरुणाला व्हॅनमधून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चालले होते. अचानक तरुणाने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली एवढेच नाही तर तरुणाने नशेच्या धुंदीत सहाय्यक फौजदाराच्या हातावर कडकडून चावा घेतला. यामध्ये जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार सुरु आहेत. तर मिर्झा आलम अजीम शेख याच्या विरोधात तक्रार दाखल करून कुर्ला पोलिसांनी या मद्यधुंद तरुणाला अटक केली आहे.

कुर्ल्याच्या परिसरात एक तरुण नशेच्या धुंदीत स्थानिकांना शिवीगाळ करत आहे अशी पोलिसांना मंगळवारी ११ च्या सुमारास तक्रार मिळाली होती. त्यानंतर काशिनाथ पुकळे एका शिपायासह घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तरुणाला ताब्यात घेतले. यावेळी त्याला व्हॅनमध्ये बसवले असता तो धक्काबुक्की करू लागला नंतर त्याने आवेशात येऊन काशिनाथ यांच्या हातालाच चावा घेतल्याने काशिनाथ यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

मिर्झा हा कुर्ला येथील रहिवासी असून तो हातगाडी चालवण्याचे काम करतो. नशेत राहून त्याने हा सर्व गोंधळ केला त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आणल्याचे कुर्ला पोलिसांनी सांगितले.

धारावीतही मारहाण
वाढदिवसानिमित्त रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेल्या डीजेला बंद करण्यासाठी गेलेल्या धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार ज्ञानेश्वर घोरपडे यांना धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर घोरपडे यांनी अधिक पोलिसांचा बंदोबस्त बोलावताच आरोपी प्रेम आणि इतर जण पसार झाले. धारावी परिसरातील हा प्रकार असून घोरपडे यांना उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने रुग्णालयात भरती करण्यात आले.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके