मुंबई पोलीस ‘क्यूआरटी’ची आणखी ११ पथके बनणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – २६/११ च्या हल्ल्यानंतर अशा घातपाती घटना घडल्यास त्याचा तातडीने मुकाबला करण्यासाठी मुंबईत बनविण्यात आलेल्या क्युआरटी पथकांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यात आणखी ११ पथके बनविण्यात येणार आहे. तसेच या जलद कृती पथकांसाठी (क्यूआरटी) आता स्वतंत्र आस्थापना बनविण्यात आलेली असून पोलीस उपायुक्त यांना कार्यालयीन प्रमुखांचे अधिकार देण्यात आलेले आहेत. क्युआरटीची मुंबईत आणखी ११ पथके बनविण्यात येणार आहे. मुंबई आयुक्तांच्या या प्रस्तावाला गृह विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. पथकातील अधिकारी, अंमलदारांच्या सेवाविषयक बाबी व प्रशासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘२६/११’च्या हल्ल्यानंतर पुन्हा अशा घातपाती घटना घडल्यास त्याचा तातडीने मुकाबला करता यावा, यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या धर्तीवर मुंबईत ‘क्यूआरटी’ पथक बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सध्या आयुक्तालयांतर्गत एकूण १५ पथके कार्यरत असून त्यामध्ये ८५२ अधिकारी-अंमलदार कार्यरत आहेत. त्यांचे वेतन, रजा व सेवाविषयक नियमांचे काम मुख्यालयातील प्रशासकीय वर्गाकडून पाहण्यात येत होते.

मुंबईत सध्या क्यूआरटीची १५ पथके कार्यरत असली तरी त्यासाठी एकूण २६ पथकांची मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी अधिकारी व अंमलदारांचे एकूण १३७८ मनुष्यबळ असणार आहे. टप्प्याटप्प्याने या पथकाची निर्मिती वाढविण्यात येणार आहे. सध्या १५ पथकांमध्ये ८५२ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत.

त्यामुळे या कामासाठी विलंब व अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या, त्याचप्रमाणे भविष्यात ‘क्यूआरटी’ची पथके वाढविण्यात येणार असल्याने कामाची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे या विभागाचा प्रशासकीय कारभार स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग असणे आवश्यक असल्याचा प्रस्ताव आयुक्तांकडून गृह विभागाला सादर करण्यात आला होता. त्यामध्ये ‘क्यूआरटी’चे प्रमुख असणाऱ्या पोलीस उपायुक्तांना कार्यालय प्रमुखाचे अधिकार देण्याचे सुचविण्यात आले होते. त्यानुसार गृह विभागाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या विभागाची प्रशासकीय कामे पाहण्यासाठी प्रत्येकी एक प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ लिपिक व रोखपाल आणि कनिष्ठ लिपिकाची दोन पदे बनविण्यात आलेली आहेत.

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

Loading...
You might also like