काय सांगता ! होय, चक्क पश्चिम बंगालच्या मजुरांनी दिल्या मुंबई पोलिस जिंदाबादच्या घोषणा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊन काळात राज्यामध्ये अडकलेल्या मजुरांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेत स्पेशल श्रमिक रेल्वे सुरु केली. या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्यात आले. मजुरांच्या मदतीसाठी लाखो हात सढळ हाताने मदत करत होते, तसेच सरकार स्वयंसेवी संस्था आणि पोलिस यंत्रणेनं मोठं काम केलयं. महत्वाचं म्हणजे मुंबई पोलिस दलातील पोलिसांनी कोरोना विरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. म्हणून देशात सर्वत्र महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांचं कौतुक होत आहे. दरम्यान, मुंबई रेल्वे स्थानकावरील एका व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यात मुंबई पोलिस जिंदाबादची घोषणा ऐकायला मिळते.

मुंबईतून पश्चिम बंगालला मजुरांना घेऊन जाणारी शेवटची ट्रेन रेल्वे स्टेशनवरून निघाली होती. मात्र, काही प्रवाशी अजूनही पाठीमागे राहिले होते. आपल्या जवळील असलेलं सामान घेऊन हे प्रवाशी रेल्वे स्टेशनवर धावत होते. त्यावेळी, मुंबई पोलिसांनी धावत जाऊन तात्काळ रेल्वे थांबविण्याची विनंती रेल्वे विभागाकडे केली. त्यानंतर, काही क्षणातच रेल्वे जागेवरती थांबली. त्यामुळे, पाठीमागे राहिलेल्या प्रवाशांना रेल्वेत जाता आलं. यावेळी, स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवी बांधवही या मजुरांच्या मदतीला त्यांचं सामन घेऊन रेल्वे स्टेशनवरती धावले. शेवटी, प्रवाशी रेल्वेत बसल्यानंतर ती पुन्हा पश्चिम बंगालच्या दिशेने निघाली. त्यावेळेस, प्रवाशांनी मुंबई पोलिस जिंदाबाद…. मुंबई पोलिस जिंदाबाद …. च्या घोषणा दिल्या. तेव्हाच तेथे उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनीही मुंबई पोलिसांचे आभार मानत जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

याबाबतचा व्हिडीओ खाना चाहिये फाऊंडेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, दिल्लीतील माहिती जनसंपर्क कार्यालयाचे उपसंचालक दयानंद गायकवाड यांनी सुद्धा आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिस जिंदाबाद म्हटलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like