‘पॉर्न’ची Live Streamimg करून कमावत होते कोट्यवधी; स्क्रिप्ट सोबतच अश्लीलता…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाऊननंतर OTT प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन एंटरटेंन्मेंट कंटेंटकडे तरुणाईचा कल वाढला आहे. मात्र, याच प्लॅटफॉर्मवरून पॉर्न कंटेटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारणातून वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून पॉर्न व्हिडिओ दिले जात आहेत. याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. पण त्यांनी ज्या काही गोष्टींचा वापर केला त्याने पोलिसांना धक्काच बसला आहे.

या रॅकेटच्या माध्यमातून युजर्सला पॉर्न व्हिडिओ दिले जात होते. आठवड्यात एक यानुसार दिवसाला एक एपिसोड तयार केला जात होता. OTT प्लॅटफॉर्मवर ओरिजनल कंटेंट दिला जात होता. ऍपच्या माध्यमातून हे रॅकेट चालवले जात होते. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून, यामध्ये एका अभिनेत्याचाही समावेश आहे. पोलिसांना याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलिसांनी असंख्य पानांची स्क्रिप्ट, मोबाईल कॅमेरा, लाईट्स आणि इतर साहित्य मिळाले आहे.

अश्लील डायलॉगही सापडला
जेव्हा पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला तेव्हा घटनास्थळी स्क्रीप्टमध्ये अश्लील डायलॉगसह पूर्ण सीनही एक-एक करून लिहिल्याचे दिसले. इतकेच नाही तर एका दिवसात क्रू, एक आठवड्याभरापासून चालणाऱ्या ऍपिसोडची शुटिंग करत होता. त्यासाठी अनेक लोकांची टीम काम करत होती.

सबस्क्रिप्शनवर व्हिडिओ
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समजले, की हे सर्व वेगवेगळ्या ऍप बेस्ड प्लॅटफॉर्मवर हे सुरु होते. हे सर्व सबस्क्रिप्शनवर आधारे लोकांना पॉर्न कंटेट दिला जात होता. यामध्ये फॉलोवर्स आणि सबस्क्रायबर्सची संख्या लाखांमध्ये आहे आणि त्याची कमाई कोट्यवधीत आहे आणि याचे सबस्क्रिप्शन चार्ज 199 रुपये होता.