मुंबईत मुसळधार पावसामुळं 4 मजली बिल्डींगचा काही भाग कोसळला, अग्‍नीशमन दलाच्या 7 गाडया घटनास्थळी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक रोडवरील इमारतीचा एक भाग अचानक कोसळला. या अपघातात अद्याप कोणीही मृत किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांसह रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची ही जुनी इमारत धोकादायक बनली होती त्यामुळे महानगरपालिकेने याबाबतची दक्षता आधीच घेतल्याचे समजते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) प्रवक्त्यांनी सांगितले की, या इमारतीला सुरक्षेच्या अभावी आधीच खाली करण्यात आले होते, त्यामुळे इमारतीत कोणीच नव्हते. इमारत कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like