Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये ‘डेक्कन क्वीन’ पुण्यात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune-Deccan Queen | मुंबई-पुणे-मुंबई डेक्कन क्वीन (Mumbai-Pune-Deccan Queen) अखेर नवीन पोशाखात पुण्यात (Pune) दाखल झाली आहे. ही ट्रेन बुधवारी रात्रीच्या दरम्यान दाखल झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी डेक्कन क्वीन ओळखली जातेय. बुधवारी 22 जून रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास डेक्कन क्वीन मुंबईहून निघाली आणि रात्री साडेआठच्या दरम्यान पुण्यामध्ये दाखल झाली आहे.

 

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर (Manoj Zanwar) यांच्या माहितीनुसार, “नव्या डेक्कन क्वीनचा नुसता रंग बदलला नसून यात नव्याने एलएचबी कोच, एलएचबी विस्डम कोच आणि एलएचबी डायनिंग कार असे सोळा डबे असणार आहेत. एलएचबी कोचमुळे रेल्वे अपघाताचे प्रमाण कमी होते तसेच, अपघात झालाच तर डबे लाइटवेट असल्याने एकमेकांवर चढत नाहीत, असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.” (Mumbai-Pune-Deccan Queen)

 

रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा (Harsha Shah) यांच्या माहितीनुसार, “पुण्यातून डेक्कन क्वीन गुरुवारी सकाळी सव्वासातला निघेल, साडेदहाच्या सुमारास ती मुंबईला पोहोचेल,” अशी माहिती त्यांनी दिली.

 

Web Title :- Mumbai-Pune-Deccan Queen | mumbai pune deccan queen railway arrives in pune railway station in new outfit look

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा