मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : पोलीसनामा ऑनलाईन

मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास झाला. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.नादुरूस्त कारला धक्का मारताना पाठीमागून टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे अपघात झाला.

सविस्तर वृत्त असे की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पनवेलजवळ ओम्नी कार बंद पडली होती. काही जण बंद पडलेल्या कारला धक्का मारत बाजूला घेत होते. त्याचवेळी पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्या कारला उडवले. अपघात इतका भीषण होता की यात कारला धक्का मारणारे तिघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले.

जखमींना उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढण्यात येत आहे. अपघातानंतर वाहतूक काही काळ खोळंबली होती.

 

 मुंबई पुणे द्रूतगती महामार्ग मृत व ज़खमींचीं नावे
1) संतोष प्रजापती 40
2) रशीद नफिज खान 24
3) जुंमन शौरतअली शेख 45
4) दिनेश जैस्वाल
5) अयोध्या यादव 26

जखमी
रामचंद्र यादव 30
कामोठे एम जी एम
दोघे वाचले आहेत
संजय छोटेलला राजभर 28
मुंद्रिका प्रसाद जैस्वाल 36
इंदिरानगर मानखुर्द मुंबई