Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रेलरची टेम्पोला धडक; महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Express Highway Accident | मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ट्रेलरने टेम्पोला धडक दिल्याने अपघात (Mumbai-Pune Express Highway Accident) झाला आहे. या भीषण अपघातानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

ट्रक आणि ट्रेलर (Trucks And Trailers) यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे ट्रक उलटला होता. तर ट्रेलरचे नुकसान झाले. या अपघातानंतर एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी (Traffic Jam) झाली आहे. या दरम्यान, अपघाताची माहिती समजताच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले आहे. चालकांचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रेलरने टेम्पोला धडक दिली होती. त्यामध्ये दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, या झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतुकीची कोंडी झाली आहे. याचा अनेकांना फटका बसला आहे. अपघातानंतर दोन्ही गाड्या महामार्गावर पलटी झाल्या होत्या. दरम्यान, या अपघातात जीवितहानी झाली का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र वाहतुक कोंडी दूर करण्याचे काम पोलिस (Highway Police) करत आहेत.

Web Title : Mumbai-Pune Express Highway Accident | traffic jam after accident on mumbai pune express way 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन