पुणेमनोरंजन

Mumbai-Pune Expressway | केवळ सर्दीच्या गोळीमुळं मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अभिनेत्याचा झाला अपघात, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) गाडी दुभाजकाला धडल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात (Pune Crime) बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजेसह (Hemant Birje) त्यांची पत्नी रेश्मा (Reshma) आणि मुलगी आमना (Amana) यादेखील जखमी (Injured) झाल्या आहेत. हा अपघात ऊर्से टोलनाक्यावर घडला आहे. हेमंत बिरजेसह तिघांवर सध्या पवना रुग्णालयात (Pavana Hospital) उपचार सुरु आहेत.

 

याबाबात अधिक माहिती अशी की, अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात (Accident) झाला. ऊर्से टोलनाक्याजवळ रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे. हेमंत बिरजे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचं पोलिसांनी (Police) सांगितलं. (Mumbai-Pune Expressway)

 

सर्दी झाली म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. त्यामुळे डुलकी लागली आणि गाडी जाऊन दुभाजकावर आदळली. त्यानंतर गाडीवर नियंत्रण मिळवलं. गाडीत मी, माझी पत्नी आणि मुलगी असे तिघेच प्रवास करत होतो. काही गंभीर दुखापत झालेली नाही, असं रुग्णालयात दाखल झालेले हेमंत बिरजे यांनी माध्यमांना सांगितलं. दरम्यान, ते मुंबईहून पुण्याला निघाले होते. तिथे आमचं घर असून तिथे राहण्यासाठी चालले होते. तिकडे जाऊन आराम करण्याचा विचार होता, असं बिरजे यांनी सांगितलं.

 

Web Title :-  Mumbai-Pune Expressway | actor hemant birje admitted in hospital after accident on mumbai pune expressway

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Back to top button