Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम (Highway Traffic Management System) अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (MSRDC) २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. (Mumbai-Pune Expressway)

या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन (Mumbai-Pune Expressway) शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेला चोरीचा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल मुळ मालकांना केला परत

दोन लाख रुपये लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

मुख्यमंत्र्यांचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल, ”माझे कुटुंब माझी जबाबदारी, सर्व टेंडर सगे-सोयऱ्यांच्या घरी”

‘मी आताच जेलमधून सुटून आलोय’, जेवणाचे बिल न देता खंडणीची मागणी; आरोपीला अटक, चाकण परिसरातील घटना

घर रंगवण्यासाठी आला अन् दागिन्यांवर हात साफ केला, चिंचवडमधील घटना