Mumbai Pune Expressway | जीव वाचवण्यासाठी कंटेनरमधून मारली उडी, पण…; मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील (Khandala Ghat) खोपोली एक्झिट (Khopoli Exit) जवळील तीव्र उतारावर भीषण अपघात (Terrible Accident) झाला. तीव्र उतारावर कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर पुढे जाणाऱ्या इर्टिगा कारला धडक दिली. कारला धडक दिल्यानंतर कंटेनर मार्गाच्या (Mumbai Pune Expressway) कडेला उलटला. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू (Death) झाला तर कार चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (दि.8) दुपारी पावणे चारच्या सुमारास झाला.

 

परशुराम कुंडलिक आंधळे Parshuram Kundlik Andhale (वय-24 रा. लिंबोडीकर, आष्टी, बीड) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. महामार्ग पोलिसांनी (Borghat Highway Police) दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचे (एमएच 43 वाय 5841) खोपोली एक्झिट जवळ असलेल्या तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे कंटेनर चालकाचे कंटेनर वरील नियंत्रण सुटल्याने पुढे जाणाऱ्या इर्टिगा कारवर मागून जोरात धडकला. तसेच कंटेनर मार्गाच्या कडेला उलटून पलटी झाला. यावेळी कंटेनर चालकाने जीव वाचवण्यासाठी गाडीमधून उडी मारली. मात्र, गाडीखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक महेश चव्हाण (PSI Mahesh Chavan) यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
तसेच देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबी (IRB) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अपघातग्रस्त कंटेनर आणि कार बाजूला घेऊन महामार्गावरील (Mumbai Pune Expressway) वाहतूक सुरळीत केली.
अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात (Khopoli Police Station) करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Mumbai Pune Expressway | container ertiga accident on mumbai pune expressway one person died on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cardiac Arrest | माता पार्वती बनून नाचणार्‍या व्यक्तीला आला हार्ट अटॅक… स्टेजवरच मृत्यू, Video

 

Nashik ACB Trap | 3000 हजार रुपये लाच घेताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

NEET Exam Result | नीट परीक्षेत दुसऱ्यांदा कमी मार्क मिळाले, रोहिणीने जीवनयात्रा संपवली