Mumbai-Pune Expressway | ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे’वर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा (व्हिडीओ)

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Mumbai-Pune Expressway | विकएंड आणि ख्रिसमसची सुट्टी असल्याने अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडले आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्सप्रेस वेवर 28 डिसेंबरला दुपारी 12 ते 2 या वेळेत ब्लॉक घेण्यात आला आहे.

बोरघाटात (Borghat) पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर (Pune Lane) वाहनांच्या रांगा (Long Queues of Vehicles) लागल्याचे पाहायला मिळत आहे. आडोशी बोगदा (Adoshi tunnel) ते खंडाळापर्यंत (Khandala) वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनांचा वेग मंदावला आहे. ख्रिसमस (Christmas) आणि विकएंड (Weekend) या पार्श्वभूमवीर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरण्यासाठी बाहेर पडल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) वाहतूक कोंडी झाली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते सकाळी 10 पर्य़ंत वाहतूक कोंडी दिसून येत होती.

 

 

अमृतांजन पुलापासून (Amritanjan Bridge) 2 ते 3 किमी च्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान, विकेंड आणि ख्रिसमस यामुळे शुक्रवार सायंकाळपासूनच एक्सप्रेस वेवर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अनेकजण ख्रिसमस साजरा करण्यासाठी गोव्याला (Goa) तसेच आपल्या गावी जायला निघाले आहेत.

 

Web Title :- Mumbai-Pune Expressway | mumbai pune expressway traffic jam long queues of vehicles

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | एसटी कामगारांच्या विलिनीकरणावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘नाही दे जा असं म्हणून…’

Post Office Schemes | पोस्ट ऑफिस रोज केवळ 50 रुपयांच्या बचतीवर देतंय 35 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

Aurangabad Crime | धक्कादायक ! लग्न ठरवून ‘लिव्ह इन’मध्ये मारली ‘मज्जा’; हुंड्यासाठी दुसरीसोबत विवाह, पुढं भलतच घडलं

Covid Vaccination | ‘हर घर दस्तक’ ! चक्क उंटावरून बसून आरोग्य कर्मचारी करताहेत लसीकरण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले फोटो शेअर