×
Homeक्राईम स्टोरीMumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोरघाटात कंटेनरने 6...

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोरघाटात कंटेनरने 6 गाड्यांना उडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी (दि.25) सकाळी साडेनऊच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने बोर घाटात सहा वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Mumbai Pune Expressway) वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) बोर घाटात किमी 38 जवळ आज सकाळी 9.30 च्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. मुंबई लेनवर भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने सोमोर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना धडक दिली. अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

 

या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी काही कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पुर्ववत केली.

 

अपघातग्रस्त वाहने
1. एर्टीगा – MH 14 JM 5455
2. एर्टीगा – MH 01 BF 8531
3. एर्टीगा – GJ 15 CK 0365
4. इनोव्हा – MH 14 JA 1385
5. इनोव्हा – MH 12 GK 8833
6. पोलो – MH -12 TS 5407

 

Web Title :- Mumbai Pune Expressway | today mumbai pune express way brake failed container hits five to six cars maharashtra accident news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Minor Girl Rape Case | पुण्यात माजी सरपंचाचं घृणास्पद कृत्य, अल्पवयीन मुलीला लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार

Uddhav Thackeray Group | ‘मातोश्री’चं किचन सांभाळते म्हणणार्‍या बाईला वैतागले म्हणत महिला नेत्याचा ठाकरेंना रामराम

Pune Crime | आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ‘पब्लिक रेस्टॉरंट अँड बार’वर गुन्हे शाखेची कारवाई

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News