Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरडी हटवण्यासाठी पुन्हा ब्लॉक, उद्या (गुरूवारी) ‘या’ वेळेत प्रवास टाळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. त्यामुळे डोंगराळ भागात दरडी किंवा दगड कोसळण्याच्या (Landslide) घटना घडत आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) सलग दोन दिवस दरडी कोसळल्याने प्रशासनाकडून दरडी काढण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहे. दोन दिवसांपूर्वी कोसळलेली दरड काढण्यासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद (Traffic Stop) करण्यात आली होती. त्यानंतर उद्या (गुरुवार दि. 27) पुन्हा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर (Mumbai Pune Expressway) विशेष ब्लॉक (Special Block) घेतला जाणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती (Mumbai Pune Expressway) मार्गावर उद्या (गुरुवार) दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत सैल झालेल्या दरडी हटवल्या जाणार आहेत. या वेळेत हलकी वाहतूक मॅजिक पॉईंट (Magic Point) पासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे (Old Pune-Mumbai Highway) वळवली जाईल. तर अवजड वाहतूक किवळे पासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाकडे वळली जाणार आहे. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरुच राहणार आहे.

23 जुलै रोजी एक्स्प्रेस वे वरील आडोशी बोगद्याच्या (Adoshi Tunnel) मागे दरड कोसळली होती. डोंगरावरील माती आणि मुरुम महामार्गावर आल्याने चिखल झाला होता. त्यामुळे 24 जुलै रोजी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता सैल झालेल्या दरडी प्रशासनकाडून हटवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या दुपारी 12 ते 2 या वेळेत एक्सप्रेस वे वरुन मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणं बंद केली जाणार आहे.

दरम्यान, गेल्या वेळी वेळेत काम न संपल्याने ब्लॉकची वेळ वाढवण्यात आली होती. त्यामुळे उद्या अशीच परिस्थिती होते का, हे पहावे लागेल. पावसाचा जोर कायम राहिल्यास सैल झालेल्या दरडी हटवण्याच्या कामाला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचा वापर करावा लागणार आहे.

मुंबई- पुण्याला रेड अलर्ट

हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि पुण्याला रेड अलर्ट
(Red Alert) दिला आहे. त्यामुळे या काळात मुंबई व
पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मागील काही तासांपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.
सततच्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
तसेच महामार्गावर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. परिणामी महामार्गावर वाहतुक कोंडी होत आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP Political Crisis | केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवारांना नोटीस,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाकडे राहणार?