Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’ वर पाणीच पाणी; पेणमध्ये गणेशमूर्ती पाण्यात?

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  मुंबई व उपनगरात सुरु असलेल्या धुंवाधार पावसामुळे मुंबई -पुणे एक्सप्रेस वे (Mumbai-Pune Expressway) वरही पाणीच पाणी झाले असून वाहनांना त्यातून वाट काढावी लागत आहे. पनवेल (panvel), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan) परिसरात जोरदार पाऊस झाल्याने या परिसरातील ओढेनाले तुडुंब भरुन वाहू लागले. ते पाणी रस्त्यावर आले आहे. पनवेल परिसरातून जाणार्‍या मुंबई -पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai-Pune Expressway) वरही पाणी साचले आहे. अगदी अवजड वाहनांची चाके अर्ध्याहून अधिक बुडतील इतके पाणी महामार्गावर साचले आहे. त्यामुळे वाहतूक संथगतीने पुढे सरकत आहे.

पेणमध्ये पूर परिस्थिती

पेण हे सर्वांग सुंदर गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे. तेथे अनेक कारखान्यांमध्ये सध्या गणेश मूर्ती तयार करण्याचे काम वेगाने सुरु आहे. मात्र, काल झालेल्या पावसाने या संपूर्ण परिसरात पाणीच पाणी झाले आहे. अनेक गणेश मूर्ती कारखान्यांमध्ये पाणी शिरले असून त्यात गणेश मूर्ती पाण्यात भिजल्या आहेत. या पावसामुळे पातळगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तिने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीच्या लगत असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. श्रीवर्धन -दिघी रस्ता खचला असून यावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. पावसामुळे कोकणासह मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title :  Mumbai-Pune Expressway | Water only on Mumbai Pune Expressway; Ganesh idol in water?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Police Suspended | पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, पोलिस उपनिरीक्षकासह सह तिघे पोलीस कर्मचारी निलंबित

Pegasus द्वारे हेरगिरी करतंय सरकार, समोर आलेल्या पहिल्या यादीत 40 भारतीय पत्रकार; भीमा कोरेगाव-एल्गार परिषदप्रकरणात सुद्धा वापर

Pune Crime | पुण्याच्या चंदननगरमध्ये वडिलांसोबत वाद घालणार्‍याला बेदम मारहाण