Mumbai-Pune Highway | मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करताय? मग जाणून घ्या ३ तासांच्या ब्लॉकदरम्यान पर्यायी मार्ग

पुणे : मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway) आज दुपारी १२ ते ३ या वेळेत तीन तासांचा ब्लॉक असणार आहे. या काळात मार्गावरील वाहतूक बंद राहिल. मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. महामार्गावर (Mumbai-Pune Highway) खोपोली ते पाली फाटा राष्ट्रीय मार्गावरील (Khopoli to Pali Phata National Highway) पुलासाठी ५० टन वजनाचे गर्डर टाकण्याचे काम गुरुवारी केले जाणार आहे. या कामासाठी या ३ तासांचा ब्लॉक आहे.

मुंबई-पुणे महामार्गावर कि.मी. ३३/८०० येथे खोपोली ते पाली फाटा (एन.एच.१६६ डी) या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग विभाग पुलाचे गर्डर बसवणार आहे. या लेनवर दुपारी १२ ते ३ या वेळेत वाहतूक बंद राहिल. त्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक खालापूर टोल नाक्याजवळील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक खालापूर टोलनाका येथे
१ किलोमीटर अंतरासाठी पुणे लेनवरून वळविण्यात येईल.

पुढील काही महिने अशाप्रकारचे काम चालणार असल्याने ब्लॉक घेतले जाण्याची शक्यता आहे.
या मार्गावर अपघात आणि अपघाताची संख्या कमी करण्यासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट यंत्रणा सुरू केली जाणार आहे.
सध्या ही कामे सुरू आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांची ठाकरे गटावर थेट टिका, म्हणाले – ”नालायकांनो आपला पक्ष सांभाळा, आता त्याच पद्धतीनं उत्तर देऊ”

Amit Shah On CAA | CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अमित शाह यांच्या वक्तव्याने मोठ्या वादाची शक्यता