Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील महिलेसह 3 वर्षांच्या बालकाचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Mumbai-Pune Highway Accident | मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai-Pune Highway Accident) शिलाटणे गावाजवळ भरधाव ट्रकची दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या दुर्घटनेत सहप्रवासी महिला आणि तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. पुष्पा पवन शर्मा (Pushpa Pawan Sharma) आणि मुलगा युवराज (Yuvraj) (वय 3 वर्ष) हे अपघातात मृत्युमुखी झाले आहेत. दरम्यान, या अपघातात दुचाकीस्वार पवन गंभीर जखमी (Seriously injured) झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शिलाटणे फाटा परिसरातून दुचाकीस्वार पवन, त्यांची पत्नी पुष्पा आणि मुलगा युवराज जात होते. त्यावेळी अवजड ट्रकने (ट्रेलर) दुचाकीला धडक दिली आहे. या अपघातात पुष्पा आणि त्यांचा मुलगा युवराज यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार पवन यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. (Mumbai-Pune Highway Accident)

 

दरम्यान, या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavla Rural Police Station) ट्रक चालका विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
तसेच, या घटनेचा अधिक तपास पोलीस कर्मचारी शरद जाधवर (Police Sharad Jadhavar) करीत आहेत.

 

Web Title :- Mumbai-Pune Highway Accident | child along with woman on two wheeler killed in road accident on mumbai pune highway

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | शिंदे गटाची ठाकरे सरकारला ‘सुरुंग’ लावण्याची तयारी, बच्चू कडू उद्या मुंबईत येण्याची शक्यता

 

Eknath Shinde | याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल; दुटप्पी भूमिकेवरुन सडेतोड पलटवार

 

NPS | निवृत्तीनंतर पाहिजे असेल दरमहिना 2 लाख रुपये पगार, तर आवश्यक करा ‘हे’ काम; वृद्धत्वात होणार नाही त्रास